
आईची स्वप्नपूर्ती करत वेल्यातील पहिली मुलगी बनली डॉक्टर
जळगाव : चोपडा तालुक्यातील वेले या गावाच्या इतिहासात गावातील मुलीने डॉक्टर होण्याचा प्रथमच बहुमान मिळविला आहे. एका अंगणवाडीसेविकेच्या मुलीने डॉक्टर होऊन वेले गावचा लौकिक वाढविला आहे.
वेले येथील रहिवासी व मजरेहोळ येथील अंगणवाडीसेविका प्रतिभा भदाणे यांची कन्या देवयानी विकास भदाणे ही या वर्षी झालेल्या बीएएमएस फायनल परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
हेही वाचा: UPSCमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न.... तुम्ही उत्तराची तयारी केलीय का ?
अंगणवाडीसेविका पदावर काम करताना प्रतिभा भदाणे यांनी पूर्वीपासूनच पोटाला चिमटा देत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. पती विकास भदाणे हे चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित जनशिक्षण संस्थान येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. चोपड्यातील विवेकानंद विद्यालयात इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवयानीने डॉक्टर बनण्याची जिद्द ठेवली आणि मेहनतीने नीट परीक्षेचा अभ्यास केला व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तिचा खासगी महाविद्यालयात नंबर लागला. मात्र, बेताची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य झाले नाही. देवयानीने दुसऱ्यांदा चिकाटीने अभ्यास करून नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली व तिचा मुंबई येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश निश्चित झाला.
हेही वाचा: संघर्षमय प्रवास करत सांगवीचा आदिवासी तरुण बनला डॉक्टर
''देवयानीने नीट परीक्षेसाठी घेतलेली मेहनत, डॉक्टर होण्याची जिद्द यामुळेच तिचे व आमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकले.'' - प्रतिभा भदाणे, अंगणवाडीसेविका
Web Title: Fulfilling Her Mothers Dream Girl Become Doctor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..