Jalgaon News : विकासासाठी 4 कोटीचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Funds News

Jalgaon News : विकासासाठी 4 कोटीचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश

जळगाव : शहरातील विविध भागांत नागरी सोयीसुविधांचा अभाव असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागातर्फे

चार कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर करण्यात आला आहे. (fund of 4 crore has been sanctioned by Social Justice Development Department of State Government for development works jalgaon news)

शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शासन निर्णय क्रमांक सावियो-२०२३/प्र.क्र. ७०/अजाक अन्वये जळगाव शहर महारपालिकेतील भागातील विकासकामांसाठी चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका हद्दीतील विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक, बौद्धविहाराचा विकस, आर.सी.सी. गटार, अनेक प्रभागांमधील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या निधीसाठी आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न केल्याचे सागंण्यात आले. निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले.