गांधीतीर्थ पाचवे धाम,पिढीसाठी प्रेरणादायी; राज्यपाल कोश्‍यारी

महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जैन हिल्स परिसरात उभारलेले गांधीतीर्थ हे भारतातील पाचवे धाम
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari

जळगाव : महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जैन हिल्स परिसरात उभारलेले गांधीतीर्थ हे भारतातील पाचवे धाम आहे, असे गौरवोद्‌गार काढत लहान मुली-मुले आणि तरुण पिढीसाठी हे धाम प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी गांधीतीर्थाबाबत लिखित अभिप्राय नोंदवला. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून राज्यपाल भारावले. जगातील सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम ‘खोज गांधीजी की’ या संग्रहालयाची कोश्यारी यांनी तासभर पाहणी केली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थाची निर्मिती केली. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दिष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com