Girish Mahajan : पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन | girish mahajan statement about Panchnama of crop damage jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Girish Mahajan

Girish Mahajan : पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शुक्रवारी (ता. २८) दिल्या. (girish mahajan statement about Panchnama of crop damage jalgaon news)

पीक व फळपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून अहवाल सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

तसेच जिल्ह्यातील फळ पिकविमा योजनेत सहभागी असलेले शेतकऱ्यांचे (केळी, लिंबू आदी) पिकांचे नुकसान झाल्यास याबाबत तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विमा कंपनीस दिल्या असून, शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी कार्यालयाकडे फळ पिकांचे नुकसान झाल्यास पूर्वसूचना द्याव्यात, जेणेकरून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यास सोयीचे होईल, अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार