Girish Mahajan : "शेतकरी आत्मनिर्भरतेच्या योजना गावापर्यंत पोचविणार" गिरीश महाजन यांची ग्वाही |girish mahajan statement about reaching all schemes of Agriculture Department to farmers at village level jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan

Girish Mahajan : "शेतकरी आत्मनिर्भरतेच्या योजना गावापर्यंत पोचविणार" गिरीश महाजन यांची ग्वाही

Jalgaon News : शेती व शेतकरी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने कृषी विभाग व कृषी संलग्न विभागाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत गावपातळीवर पोचविण्यास पाठपुरावा करून सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली. (girish mahajan statement about reaching all schemes of Agriculture Department to farmers at village level jalgaon news)

श्री. महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बुधवारी (ता. १७) शेतकऱ्यांना शेती अवजारेवाटप कार्यक्रम झाला. त्या वेळी मंत्री महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी अमिन मित्तल, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे खरेदी केलेल्या अवजारांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेती व शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कृषी विभागातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक व उपयुक्त असलेली सर्व प्रकाराची यंत्रसामग्री, अवजारे, ठिबक व तुषार सिंचन संच, फळबाग लागवड तृणधान्यविषयक बियाण्यांचे वितरण आदी घटकांना आवश्यक असलेला निधी जळगाव जिल्ह्यात उपलब्ध असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

रेशीम शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती या कृषी संलग्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार केला असून, शेती व शेतकरी स्वावलंबी होऊन शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतील, असा विश्‍वासही श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

लाखावर शेतकऱ्यांना सातशे कोटींचे अनुदान

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी क्षेत्रासाठी असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना जवळपास सातशे कोटींचा लाभ करून देण्यात आला आहे. यात सर्वाधिक पाचशे कोटींचे अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आले आहे.

अशा योजना, असे अनुदान

-राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान : ५०४५ शेतकऱ्यांनी यंत्र अवजारे खरेदी केले असून, त्यापोटी ३१ कोटी २३ लाख एवढे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग (यात ८८६ ट्रॅक्टर, १५४ रोटरव्हेटर, ८०७ नांगर, ६३९ पॉवर विडर आदी यंत्र खरेदी)

-एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम : २७० शेतकऱ्यांना दोन कोटी ३७ लाख अनुदान

-राष्ट्रीय कृषी विकास योजना : ७९ शेतकऱ्यांना ६३ लाख अनुदान वर्ग

-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) : ७० हजार ३०१ शेतकऱ्यांना ४९९ कोटी ८८ लाख

-केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘प्रतिथेंब अधिक पीक’ माध्यमातून ठिबक व तुषार सिंचन संच खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील ४० हजार ७०४ शेतकऱ्यांनी ३९ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी केले असून, त्यासाठी १४८ कोटी अनुदान