Jalgaon Crime News : व्हॅाट्‌सॲपवर चॅटिंगनंतर विनयभंग; लग्नाचा हट्ट करून मुलीस धमकावल्याप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon crime

Jalgaon Crime News : व्हॅाट्‌सॲपवर चॅटिंगनंतर विनयभंग; लग्नाचा हट्ट करून मुलीस धमकावल्याप्रकरणी गुन्हा

जळगाव : फेसबुक फ्रेन्ड असलेल्या तरुणीसोबत अश्‍लील कृत्य करणाऱ्या भामट्याविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ‘माझ्यासोबत लग्न कर नाय, तर तुझ्या पप्पाला मारून टाकेल’, अशी धमकी देत मुलीचा महिन्याभरापासून पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन मजनूविरोधात पीडितेने कुटुंबियांना सांगितल्यावर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची जानेवारी महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. दोघेही एकमेकांशी व्हॅट्‌सॲपद्वारे चॅटींग करू लागले. १४ फेब्रुवारीस ‘व्हॅलेटाईन-डे’च्या दिवशी मुलीचा विश्वास संपादन केला व तिला तलाव परिसरातील जंगलात तो फिरायला घेऊन गेला.

त्याठिकाणी मुलाने मुलीचा विनयभंग केला. नंतर तरुणाने १४ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान मुलीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. एवढंच नाही, तर मुलाने मुलीशी रात्री बेरात्री अश्‍लील चॅटींगही केली. या त्रासाला कंटाळून सोमवारी (ता. ६) मुलीने तिच्या वडिलांना एक मुलगा सतत पाठलाग करतो, असे सांगितले.

त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला विश्वासात घेतले. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत गेल्या दीड महिन्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या पालकांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून त्या मुलाविरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर तपास करीत आहेत.

टॅग्स :JalgaonCrime Newswhatsapp