Kamgar Kalyan Puraskar : शासनाचा कामगार कल्याण पुरस्कार अमळनेरच्या प्रियदर्शनी भोसलेंना जाहीर

Priyadarshini Bhosale
Priyadarshini Bhosaleesakal

Jalgaon News : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ५१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाले असून, यात अमळनेरच्या प्रियदर्शनी एकनाथ भोसले यांचा समावेश आहे. (Government Kamgar Kalyan Puraskar announced to Priyadarshini Bhosale of Amalner jalgaon news)

महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये अंशदान जमा करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी १९७९ पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. खानदेशातील धुळे, जळगाव, भुसावळ, जामनेर तर अमळनेरच्या प्रियदर्शनी भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Priyadarshini Bhosale
Ration Shop License Cancel : अमळनेरला 3 रेशन दुकानांचे परवाने रद्द; रेशन माफियांचे धाबे दणाणले

भोसले या अमळनेर येथील महाराष्ट्र बँकेत १२ वर्षांपासून रोखपाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अनाथ, अंध, अपंग यांच्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रियदर्शनी भोसले या प्रा. योगेश तोरवणे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, अमळनेरच्या शिरपेचात मानाचा एक तुरा रोवला गेला आहे.

Priyadarshini Bhosale
Jalgaon News : लग्नात व्यस्त पालकाचा चिमुरडा पोचला थेट पोलिस ठाण्यात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com