ग्रामपंचायत निवडणुक: जळगाव जिल्ह्यात ७८३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती 

ग्रामपंचायत निवडणुक: जळगाव जिल्ह्यात ७८३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती 

जळगाव ः जिल्ह्यातील सुमारे ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ७८३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती संबंधित तहसीलदारांनी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणवर्गही नुकताच झाला आहे. 

निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारी २०२१ ला मतदान घेण्याचे आदेश आज दिले आहेत. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या १४ डिसेंबरला प्रसिद्ध झाल्या आहे. जळगाव तालुक्यात तहसीलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांनी निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देऊन प्रशिक्षित केले. निवडणूक अर्ज भरताना तो ऑनलाइन भरावा लागेल. नंतर त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात प्रिंटसह इतर कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. 

४३ टेबलांवर अधिकारी 
निवडणूकप्रक्रियेत तहसील कार्यालयात ४३ टेबल मांडण्यात येणार आहेत. त्यात ग्रामपंचायतनिहाय 
अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २३ तारखेपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

वाचा-  आगळावेगळा छंद..चार महिन्यांत तीनशे ‘स्केचेस’‌ 

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायती 
जळगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण व लोकसंख्या दहा हजारांवर असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात तरुणांत जोश आहे. जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र. न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदी. 

...असा आहे निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे - २३ ते ३० डिसेंबर 
छाननी - ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्ह वाटप - ४ जानेवारी २०२१ 
मतदान - १५ जानेवारी 
मतमोजणी - १८ जानेवारी 

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी 
तालुका - ग्रामपंचायती 

जळगाव - ४३ 
जामनेर - ७३ 
धरणगाव - ४७ 
एरंडोल - ३७ 
पारोळा - ५८ 
भुसावळ - २६ 
मुक्ताईनगर - ५१ 
बोदवड - २९ 
यावल - ४७ 
रावेर - ४८ 
अमळनेर - ६७ 
चोपडा - ५२ 
पाचोरा - ९६ 
भडगाव - ३३ 
चाळीसगाव - ७६ 
एकूण - ७८३  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com