Gulabrao Patil : पोकरा योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान : पालकमंत्री पाटील | Guardian Minister Patil statement about Pokhara scheme for farmers jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

Gulabrao Patil : पोकरा योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान : पालकमंत्री पाटील

Jalgaon News : ‘पोकरा’प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण ४६० गावांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ३९५ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असून, त्यापैकी आजपावेतो ७० हजार ३०१ शेतकरी बांधवांना ४९९ कोटी ८८ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. (Guardian Minister Patil statement about Pokhara scheme for farmers jalgaon news)

६ हजार २१३ लाभार्थ्यांचे ५७ कोटी २१ लाखांचे अनुदान वितरण अंतिम टप्यात आहे. त्यामुळे पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

खरीप हंगाम २०२२ राज्यस्तरीय ज्वारी पिक अंतर्गत शासनाने निवड केलेले ज्ञानेश्‍वर चिंतामण पाटील (रा. गहुखेडे, ता. रावेर) व अर्जुन दामू पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) या शेतकऱ्यांचा सन्मान अजिंठा विश्रामगृहात करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते.

अनुदान दिलेल्यांमध्ये ठिबक सिंचन संच, शेळी पालन, शेडनेट गृह, शेततळे, पॉली हाऊस, इलेक्ट्रिक मोटारपंप, फळबाग व वनिका आधारित शेती, पाईप, रेशीम उद्योग अशा २२ प्रकारच्या बाबींवर ४९९ कोटी ८८ लाख रूपये इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते बांधावर १० टन खताच्या वितरणासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार ४५ लाभार्थ्यांना ३१ कोटी २४ लाख रुपयांचे ट्रक, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर व अनुषंगिक औजारांसाठीचे अनुदान प्रातनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाची पाहणीही मान्यवरांनी केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. २०२२-२३ व २०२३-२४ मधील योजनानिहाय उदिष्ट व सद्यस्थितीची माहिती त्यांनी या वेळी दिली. जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी शिंदे यांनी आभार मानले.