Gulabrao Patil : सत्तेच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट करणार : गुलाबराव पाटील | Gulabrao Patil statement about Market committee transformation through power jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

Gulabrao Patil : सत्तेच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट करणार : गुलाबराव पाटील

Jalgaon News : सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाजार समितीचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. ( Gulabrao Patil statement about Market committee transformation through power jalgaon news )

पाळधी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील होते.

आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकार पॅनलचे उमेदवार निवडून देण्याचे तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, सुभाष पाटील, गजानन पाटील, भगवान महाजन आदींनी सहकार पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, गजानन पाटील, ऋषिकेश चव्हाण, प्रेमराज पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, संजय माळी, मुकुंदराव नन्नवरे, विलास महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील, प्रास्ताविक सुनील पवार तर आभार पी. एम. पाटील यांनी मानले.