
Gulabrao Patil | पाळधीतील दंगल माझ्या जीवनातील वाईट प्रसंग : गुलाबराव पाटील
जळगाव : पाळधी येथे झालेली दंगल ही आपल्या जीवनातील सर्वात वाईट प्रसंग आहे, सन १९९२ पासून सतत ३२ वर्षे आपण या ठिकाणी जातीय दंगल होऊन न देता सलोखा जपला आहे. अशा भावना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. (Gulabrao Patil statement about paldhi dangal jalgaon news)
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वर्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाची बैठक हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. यानंतर पालकमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की गावात मुस्लीम समाजाचे लोक नमाज पठण करीत असताना, बाहेरगावहून आलेली दिंडी रस्त्याने जात होती, त्यावेळी आवाज कमी करण्यास सांगण्यात आले, त्यावर गैरसमज झाले व त्यातून दंगल झाली.
बाहेरची दिंडी गेली परंतु गावात दंगल झाली, ती दिंडीही आपलीच आहे. केवळ गैरसमजातून हे घडले आहे. मात्र माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट प्रसंग आहे. गेली ३२ वर्षे मी गावात दंगल होवू दिली नाही, गावात जातीय सलोखा आपण कायम ठेवला.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
मी आजारी असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही, मात्र मुलाने दोन तास दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. दंगल करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे दोन्ही समाजातील लोकांवर कारवाई होईल. पोलिस सीसीटीव्ही पाहून कारवाई करतील.