Jalgaon Crime News : मुक्ताईनगरला 36 लाखांचा गुटखा जप्त

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : गुटखा विक्री व वाहतुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ३६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. (Gutkha worth 36 lakh seized from Muktainagar Jalgaon Crime News)

मिळालेल्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील पूर्णा नदीकाठावर सापळा रचला. तेथे प्रतिबंधित अन्न पदार्थांची (गुटखा) चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून (एमएच २०, ईएल ५८४९) व (एमएच २०, ईएल १७३७) या वाहनांना थांबविले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Jalgaon News : नकली तृतीयपंथीयास मारहाण

त्या वाहनांमध्ये प्रतिबंधित पानमसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामुळे ही वाहने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू व वाहनासह एकूण ३५ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा माल जप्त करून वाहनचालक, क्लीनर, वाहनमालक व साठा मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रा. मा. भरकड यांनी केली.

crime news
Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून मुलाने संपविले जन्मदात्रीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com