Jalgaon Crime News : पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ | Harassment of married women for demand of money jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman harrasment

Jalgaon Crime News : पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

Jalgaon News : अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथील माहेर व पांढरद (ता. भडगाव) येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Harassment of married women for demand of money jalgaon crime news)

अंतुर्ली खुर्द येथील शीतल पाटील यांचा विवाह १३ वर्षांपूर्वी पांढरद येथील अजय पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर पाच-सहा वर्षे सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. अजयला दारूचे व्यसन लागल्याने कौटुंबिक वाद सुरू झाले.

शीतलने त्याबाबत नातलगांना सांगितल्यावर ‘तू माझी बदनामी करते’, या कारणावरून वाद व छळ वाढत गेला. दोघांची समजूत घालून शीतलला सासरी पाठविण्यात आले. परंतु शेतीसाठी दोन लाख रुपये माहेरून आणावे, या मागणीसाठी पुन्हा सासरची मंडळी छळ करू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विवाहितेने वरील आशयाची तक्रार पोलिसात दिल्यावरून पती अजय पाटील, सासरा अशोक पाटील, जेठ ज्ञानेश्वर पाटील, जेठाणी रूपाली पाटील, अनिल व सतीश पाटील (सर्व रा. पांढरद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.