यावलच्या हर्षल महाजनचे UPSC परीक्षेत घवघवीत यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या ६८५ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले.
UPSC
UPSC esakal

जळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या ६८५ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज (ता.३०) जाहीर झाले. यात मूळचे दहिगाव (ता.यावल) येथील रहिवासी हर्षल राजेश महाजन यांनी ४०८ वी रँक मिळवत यश प्राप्त केले. (Success in UPSC exams)

हर्षल महाजन यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले आहे. मुंबई आयआयटीतून त्यांनी बी- टेकची पदवी प्राप्त केलीय. हर्षल यांचे वडील राजेश महाजन पर्जन्य जलवाहिनी या विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झालेले असून आई स्वाती महाजन या उद्योजिका आहे.

UPSC
UPSC Result 2022: महाराष्ट्रातून प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम

हर्षलला पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील (आयएएस), दिग्विजय पाटील (आयएफएस), जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर आयकर आयुक्त विशाल मकवाना, दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, जिल्हा परिषद सीईओ पंकज आशिया यांनी मार्गदर्शन केले आहे.

UPSC
भारताला सर्वोत्तम अधिकारी देणाऱ्या UPSC परीक्षेला ९६ वर्षांचा इतिहास आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com