Help Fair 5 Exhibition : हेल्प फेअर- ५ प्रदर्शन जळगावकरांच्या सेवेत; 4 दिवस सेवाकार्यावर मंथन

help fair 5
help fair 5esakal

जळगाव : ‘हेल्प फेअर-५’ सागर पार्कवर खानदेश महोत्सवासोबत सुरू होत आहे. हा महोत्सव २ एप्रिलपर्यंत रोज दुपारी चार ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे. (Help Fair 5 exhibition is being held to bring work of public service to people jalgaon news)

मानवतेच्या मार्गावर चालणारी प्रत्येक व्यक्ती समाज कल्याणासाठी झटत असते आणि विविध संस्थांमार्फत सामाजिक कार्य करून समाज विकासाचे ध्येय जोपासत असते. अशाच व्यक्ती आणि संस्था म्हणजे मानवतेची मंदिरे होय, म्हणूनच लोकांसाठीचे, लोकसेवेचे कार्य लोकांपर्यंत पोचविण्याऱ्या ‘हेल्प फेअर- ५’ महोत्सव होत आहे.

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व पर्यावरण क्षेत्रातील नामवंत अशा ३८ सेवाभावी संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ‘हेल्प-फेअर- ५’ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ३२ स्टॉल असून, विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या सहा संस्था अन्य जिल्ह्यांतून सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

help fair 5
Market Committee Election : स्मिता वाघ, शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढणार

या चारदिवसीय महोत्सवात पाच आरोग्यदूत पुरस्कार, तीन शौर्यसेवा पुरस्कार व दोन उत्कृष्ट सेवा संस्था पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. १) सायंकाळी सहाला प्रमुख वक्ते विक्रम अग्निहोत्री यांचे व्याख्यान होणार आहे.

दोन दिवस कार्यशाळा

या महोत्सवात १ व २ एप्रिलला सेवाभावी संस्थांसाठी कार्यशाळा होईल. या दोनदिवसीय कार्यशाळेत ‘सेवा कार्यात भविष्यात येणारे बदल’, याविषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

help fair 5
Jalgaon News | खडसेंवर आरोप करण्याऱ्यांनी आपण काय केले हे तपासावे : अशोक लाडवंजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com