Amrut Yojana : अमृत’ला अडथळा ठरणारी पिंप्राळ्यातील झोपडी हटविली; अतिक्रमण विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amrut scheme

Amrut Yojana : अमृत’ला अडथळा ठरणारी पिंप्राळ्यातील झोपडी हटविली; अतिक्रमण विभागाची कारवाई

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील खंडेरावनगर भागात अमृत योजनेची (Amrut Yojana) पाइपलाइन जोडण्यासाठी एक झोपडी अडथळा ठरत होती. (hindrance to Amrut yojana hut in Pimprala was removed by Municipal Encroachment Department jalgaon News)

अमृतची पाइपलाइन टाकीला जोडली जात नसल्यामुळे परिसरातील कॉलन्यांमधील अमृत योजना सुरू करण्यास अडथळे निर्माण झाले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही झोपडी हटविण्याची कारवाई केली.

याबाबत महिती देताना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की खंडेरावनगरातील पाण्याच्या टाकीवरून परिसरातील विविध भागात पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या भागातील अमृत योजनेच्या नवीन पाइपलाइनचे कामदेखील पूर्ण झाले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

परंतु ही नवीन योजना पाण्याच्या टाकीला जोण्यासाठी झोपडीचा अडथळा येत होता. संबंधित झोपडीमालकाला भेटून मनपाच्या अधिकाऱ्यांनी झोपडी रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी नकार दिला.

परंतु सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून त्या झोपडीचे अतिक्रमण काढण्यात आले. या वेळी मनपा उपायुक्त गणेश चाटे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, साजिद अली, संजय पाटील, भानुदास ठाकरे, नाना कोटी, नितीन भालेराव यांच्यासह पथकातील कर्मचारी उपस्थित होते.