Jalgaon News : शेतात सापडला मानवी सांगाडा | Human skeleton found in farm jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : शेतात सापडला मानवी सांगाडा

Jalgaon News : नशिराबाद शिवारातील शेतात मानवी कवटी व हाडे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे या मानवी सांगाड्याजवळ मोबाईल व आधारकार्डदेखील सापडले आहे. त्याआधारे मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. (Human skeleton found in farm jalgaon news)

नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नशिराबाद शिवारात नारायण पाथरवट हे शेतात फेरफटका मारत असताना त्यांच्या शेताजवळ मानवी कवटी व हाडे आढळून आले. या संदर्भात त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावेळी मानवी कवटीच्या बाजूला आधारकार्ड, सॅमसंग मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यानुसार मयत व्यक्ती हा रामा उराव (वय ५२, रा. मोकाऱ्या, जि. लोहरदगा, झारखंड) असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्या संदर्भात पोलिसांनी चौकशीला सुरवात केली आहे.

टॅग्स :Jalgaondeath