Jalgaon Crime : उचलून घेऊन जाण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग | In case of molestation Two suspects arrested jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime : उचलून घेऊन जाण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग

Jalgaon News : ‘तू काय माधुरी दीक्षित आहे? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन, अशी धमकी देत विवाहितेचा दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना तालुक्यात घडली. या बाबत रावेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (In case of molestation Two suspects arrested jalgaon crime news)

तालुक्यातील ग्रामीण भागातील एक विवाहिता दुपारच्या वेळी आपल्या घराच्या ओट्यावर कपडे धुत असताना त्याच वेळी संशयित युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी हे दोघेही आले. ते आपसात बोलत उभे होते. या वेळी विवाहितेने तुम्ही याठिकाणी का उभे राहिले? तुमच्या अंगावर पाणी उडाले तर तुम्ही उलट मलाच बोलणार, असे म्हणाली.

त्यावर युनूस हा विवाहितेकडे पाहून तू काय माधुरी दीक्षित आहे?, एक दिवस तुला उचलून घेऊन जाईन, असे म्हणत त्याच्यासोबत असलेला इरफान हा देखील युनूसच्या बोलण्यात होकार देत एक दिवस तुला उचलून घेऊन जाऊ, असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करत दोघांनी लज्जास्पद कृत्य केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या बाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी पीडित विवाहितेला दिली. या प्रकरणी चार दिवसानंतर विवाहितेने रविवारी (ता.१४) रात्री रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा तरुणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस कर्मचारी सतीश सानप तपास करीत आहेत.