तोंडापूर : परिसरात बुधवारी (ता. २२) दुपारी एक तास वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेचे ट्रान्स्फॉर्मर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. (in tondapur village Power transformers collapsed due to strong winds in the farmers field)
तोंडापूरसह परिसरात कुंभारी बुद्रुक, भारुडखेडा, मांडवे, ढालगाव येथे बुधवारी दुपारी तीनला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात वाऱ्यामुळे कुंभारी शिवारात शरीफ तडवी यांच्या शेतातील ट्रान्स्फॉर्मर व विजेचे खांब कोसळले.
जोरदार पावसामुळे शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने लहान नाले भरून वाहिले. परिसरात पडलेल्या पावसामुळे शेतातील मातीचे भरावही वाहून गेले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिसरात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परिसरात पहिल्याच जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.