Jal Jeevan Mission : अंबारे-करणखेडा गावाचा पाणीप्रश्न सुटणार; पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन | jal jeevan mission Bhoomipujan of 52 lakh water supply scheme by MLAs jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jal jeevan mission Bhoomipujan of 52 lakh water supply scheme by MLAs jalgaon news

Jal Jeevan Mission : अंबारे-करणखेडा गावाचा पाणीप्रश्न सुटणार; पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

Jal Jeevan Mission : तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे ५२ लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. (jal jeevan mission Bhoomipujan of 52 lakh water supply scheme by MLAs jalgaon news)

जलजीवन मिशन योजनेंतर्गत होत असलेल्या या नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. आमदार अनिल पाटील यांनी यावेळी गावातील विकासकामांचा आढावा घेतला. गावाच्या तसेच परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बाजार समिती संचालक समाधान धनगर, बाजार समिती माजी संचालक जे. के. पाटील, बाळू हिंगोणेकर, गजेंद्र पाटील (अंबारे), सुनील मन्साराम पाटील (सरपंच, अंबारे), कविता पाटील (सरपंच, करणखेडा), ग्रामपंचायत सदस्या अलकाबाई धनगर, पोलिस पाटील शांताबाई पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विश्वास पाटील, माजी सरपंच सुधाकर पाटील, लक्ष्मण पाटील,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुलाब धनगर, यशवंत पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, सुरेश धनगर, अनिल बागूल, निशिकांत सूर्यवंशी, माजी सरपंच लोटन शिवदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुरव, सदस्य महेंद्र पाटील, दिलीप पाटील, पंकज धनगर, गजानन कोळी, राकेश धनगर, विजय भिल, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, विजया राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...ही आहेत विकासकामे

नाविन्यापूर्ण योजनेंतर्गत संरक्षकभिंत बांधकाम १० लाख, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजमंदिर बांधकाम १० लाख, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण ५ लाख, जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे ५२ लाख असे एकूण रक्कम ७४ लाखांची कामे आमदारांच्या प्रयत्नातून होत आहेत.

टॅग्स :Jalgaonjal jeevan mission