जळगाव जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटांतील बालकांची कोरोना लसीकरणास ना?

बालकांचे लसीकरण केवळ २.४० टक्के; जिल्ह्यात आतापर्यंत ५१ लाख जणांचे लसीकरण
जळगाव जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटांतील बालकांची कोरोना लसीकरणास ना?
जळगाव जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटांतील बालकांची कोरोना लसीकरणास ना?Sakal

जळगाव : कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी कोरोना लसीकरण सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे प्रतिकार शक्ती वाढते (इम्युनिटी). लसीकरणामुळेच कोरोनोच्या तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झालेली नाही. लस हाच कोरोनावर प्रतिबंधक उपाय असला तरी १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. या लसीकरणाच्या चार दिवसात केवळ तीन हजार ४९९ मुलांनी (२.४० टक्के) लस घेतली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ५१ लाखांवर जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील दोन लाख २५ हजार ८९८ युवकांना लसीकरण करावयाचे लक्ष्य होते. त्यापैकी एक लाख ३१ हजार ४५१ युवकांनी लसीकरण करून घेतले. त्याचे प्रमाण ५८.१९ टक्के आहे. या वयोगटातील ९४ हजार ४४७ युवक अद्यापही लसीकरणापासून लांब आहेत. याच वयोगटात दुसरा डोस ७२ हजार ५८६ युवकांनी घेतला. हे प्रमाण ३२.१३ टक्के आहे. अद्यापही दूसरा डोस घेण्यापासून एक लाख ५३ हजार ३१२ युवक बाकी आहेत.

१५ वर्षावरील ३६ लाख ३२ हजार ४९८ नागरिकांना दोन्ही लस द्यावयाच्या होत्या. त्यापैकी २१ लाख ६१ हजार ६४१ जणांचे लसीकरण झाले. हे प्रमाण ५९.५१ टक्के आहे. अद्यापही सात लाख ३९ हजार ५३४ नागरिक लस घेण्याचे बाकी आहेत.

बूस्टर डोस अद्यापपर्यंत ४६ हजार ४२६ जणांनी घेतला आहे. हे प्रमाण २८ टक्के आहे. अद्यापही एक लाख १९ हजार ४०३ जण बूस्टर डोस घ्यावयाचे बाकी आहेत. एक लाख ६५ हजार ८२९ जणांना बूस्टर डोस देण्याचा लक्षांक होता. आतापर्यंत ५१ लाख ९ हजार २४८ जणांना जिल्ह्यात लस घेतली आहे.

बालकांचे लसीकरण न होण्याची कारणे अशी

  • बालकाला ताप येईल

  • मुलांच्या परिक्षा सुरू होतील

  • कडक उन्हाळा असल्याने नंतर घेवू

  • शाळेव्यतिरिक्त मुले इतर ठिकाणी जात नाहीत

  • त्याच्या मित्रांनी लस घेतली नाही

  • शाळेने लसीकरणाची सक्ती केलेली नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com