Jalgaon News : जिल्हाधिकारी साहेबांनी वाटेत वाळू वाहतूक पाहिली अन् केली धडक कारवाई

Illegal sand transportation tractors seized jalgaon
Illegal sand transportation tractors seized jalgaonsakal

जळगाव : अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी (ता. २) सकाळी श्री. मित्तल यांनी अवैध वाळू उपसा करून जाणारे दोन ट्रॅक्टर पकडले.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सोमवारी सकाळी सहाला जिल्हाधिकारी घरून शहरात येत असताना, त्यांना आकाशवाणी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर जातांना दिसले. त्याला त्यांनी ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता, गिरणा नदीपात्रातून वाळू आणली व आणखी काही ट्रॅक्टर वाळू आणत असल्याचे चालकाने सांगितले.

श्री. मित्तल यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना फोन करून तातडीने नदीपात्राकडे येण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी मित्तल, तहसीलदार पाटील गिरणा नदीपात्रापर्यंत पोहोचेपर्यंत वाळू काढणाऱ्यांनी पळ काढला. तरीही एका ट्रॅक्टरला पकडण्यात यश आले.

Illegal sand transportation tractors seized jalgaon
Jalgaon News : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून वर्षभरात 181 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महसूलचे निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, तलाठी रवींद्र घुले, रमेश वंजारी यांनी दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यलयात जमा केले आहेत.

एक ट्रॅक्टर रवी कुंभार यांचे असून, वाहनावर क्रमांक नव्हता. त्याचा चेसीस नंबर डब्लूएससीएन ४३६०६१८५४५५, दुसरा ट्रॅक्टर राजपूत यांचा असून, चेसीस नंबर डब्ल्यूएक्ससीएच ४०९०६००४३६० असा आहे. दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल होईल. सोबतच एक लाख चाळीस हजारांचा दंडही होईल.

लिलाव नसल्याने चोरी

जिल्ह्यात वाळू गटांचे लिलाव अद्याप झालेले नाहीत. तब्बल सहा महिन्यांपासून वाळू अवैधरित्या नागरिकांना मिळत नाही. वाळू गटांच्या लिलावांना राज्य पर्यावरण विभागाने परवानगी देणे अपेक्षित आहे. तसे प्रस्तावही जिल्हा प्रशासनाने पाठविले आहेत. मात्र, त्याला अजूनही परवानगी मिळालेली नाही. परिणामी वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे.

Illegal sand transportation tractors seized jalgaon
Jalgaon News : महापालिकेने घरपट्टी भरण्याच्या दंडाची 'या' तारखेपर्यंत वाढविली

महसूल विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस वाळू चोरांच्या मागावर असतात. तरीही वाळू चोरी होत आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा जिल्हाधिकारी मित्तल, तहसीलदार पाटील यांनी स्वत: जाऊन कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com