Jalgaon News : पार्किंगचा दुचाकीस्वारांना भुर्दंड, पण सुविधेच काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fined Collected News

Jalgaon News : पार्किंगचा दुचाकीस्वारांना भुर्दंड, पण सुविधेच काय?

जळगाव : शहर वाहतूक नियंत्रण विभागाने दोन दिवस अचानक रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या दुचाकी जप्त करून कारवाई केली. मात्र, शहरात पार्किंग सुविधा कुठेही नाही, तसेच व्यापारी संकुलधारकांनीही ती केलेली नाही.

मग सर्वसामान्य दुचाकीधारकांवर ही अन्यायकारक कारवाई का केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याबाबत आमदार व खासदार आवाज उठविणार काय, याकडेही जनतेचे लक्ष आहे. (Jalgaon Facing traffic and parking problem businessman frustrated that problem City Traffic Control Branch of Police alert about that and take action jalgaon news)

हेही वाचा: Nashik News : सिंचन पुनर्स्थापना खर्चाची दंडमाफी शासन दरबारी; निर्णयाची प्रतीक्षा

पोलिसांच्या शहर वाहतूक नियत्रंण शाखेने दोन दिवस सायंकाळी अचानकपणे रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने जप्त केली. सायंकाळी या विभागाचे पथक अचानक एक मेटॅडोर घेऊन आले. त्यांनी प्रथम थेट नाथ प्लाझाजवळ लावलेल्या दुचाकी उचलून मेटॅडोरमध्ये टाकल्या. त्यानंतर पुढेही अशीच कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही गोलाणी संकुलातील हनुमान मंदिराजवळ लावलेली वाहने जप्त करण्यात आली.

पार्किंग पट्टे नाहीत, मग कारवाई कशी?

पोलिसांच्या शहर वाहतूक विभागाच्या अचानक करण्यात आलेल्या कारवाईबद्दल नागरिकामध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात कोठेही पार्किंगची सुविधा नाही. कोठेही पार्किंगचे पट्टे आखलेले नाहीत. मग पोलिसांतर्फे पार्किंगबाबत कारवाई कोणत्या आधारवर केली जात आहे, असा प्रश्‍नही नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : वणी- नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर गाडी संपूर्ण जळून खाक!

व्यापारी संकुलात पार्किंग कुठे?

शहरात मोठमोठे व्यापारी संकुल उभे केले आहेत. मात्र, तेथे कोणतीही पार्किंग सुविधा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच वाहने पार्किंग करावी लागत आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून वाहन जप्त करून दंडाची आकारणी होत आहे. काहीही दोष नसताना दुचाकीधारकांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

पार्किंग नसलेल्या संकुलाचे काय?

शहरात वाहन पार्किंगची सुविधा तळमजल्यावर दाखवून बहुतेक संकुलधारकांनी त्या ठिकाणी दुकाने काढली आहेत. याबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. नेहरू चौक ते घाणेकर चौकदरम्यानच्या १९ संकुलधारकांनी पार्किंगची सुविधा केली नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याच संकुलासमोर वाहने लावल्यास त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात येत आहे.

वाहतूक शाखेने अगोदर सुविधा करावी

रस्त्यावर लागलेली दुचाकी उचलण्याऐवजी शहर वाहतूक शाखेने संबंधित व्यापारी संकुलांना नोटीस बजावून पार्किंगची सुविधा करण्याबाबत आदेश द्यावेत. पार्किंग सुविधा असूनही वाहने रस्त्यावर लागत असतील, तर वाहधारकांवर कारवाई करावी. निदान शहरात ‘पी वन‘, ‘पी टू’ पार्किंग सुविधा तरी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: Nashik News : द्राक्षांच्या कमी निर्यातीचा देशांतर्गत ताण!