Jalgaon News |बनावट आधार, पॅनच्या सहाय्याने प्लॉट विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : बनावट आधार, पॅनच्या सहाय्याने प्लॉट विक्री

जळगाव : बनावट आधार, पॅनच्या सहाय्याने प्लॉट विक्री

जळगाव : खुनासह बनावट नोटा तयार करणे, फसवणूक करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीने बनावट आधार व पॅन कार्डचा वापर करुन प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एमआयडीसीच्या गुन्हे शोध पथकाने जगन रामचंद्र नारखेडे (४२, रा. भालेगाव, ता. मलकापूर बुलढाणा) याला मलकापुर येथून अटक केली असून खरेदी खतावरील फोटोवरुन संशयिताची ओळख पटली आहे.

जळगाव येथील व्यापारी सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर मनपा हद्दीत बखळ प्लॉट असून त्याचे बाजारमुल्य ३५ लाख रुपये आहे. सुरेश बाफना यांनी आपल्या मालकीच्या प्लॉटचा सात बारा उतारा मिळवला असता त्यांना आपल्या प्लॉटवर आपल्या ऐवजी दुसऱ्याच चार जणांची नावे आढळून आली. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याच्या तपासात या बनावट प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारात ओळख देणाऱ्या महिलेस सर्वप्रथम अटक करण्यात आली. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचा व्यवहार करताना खरेदी खतावर संशयित जगन नारखेडे याचा फोटो होता. त्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला मलकापूर येथून अटक केली आहे. जगन नारखेडे याच्याविरुद्ध २००९ मध्ये ठाणे व २०१३ मध्ये जिल्हापेठ जळगाव पोलिस स्टेशनला नकली नोटा तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. इगतपुरी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा २०२० मध्ये एक गुन्हा दाखल आहे. श्रीरामपूर व अहमदनगर येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे. तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत गुन्हेगार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे व त्यांचे सहकारी दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

Web Title: Jalgaon Fake Aadhaar Sale Plot Help Of Pan Identified Photo Murder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top