Latest Marathi News | जळगाव : बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer death

जळगाव : बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

बोदवड : बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मनूर बुद्रुक येथे घडली. भगवान भिका माळकर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

शेतकरी भगवान माळकर हे शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास शेतात बैलगाडी घेऊन गेले असता बैलाने त्यांना शिंग मारले. गुप्तांगावर मार लागल्याने त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासनी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी प्रकाश रमेश बिजागरे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप झरवाल करीत आहेत. भगवान माळकर यांच्या अचानक मृत्युमुळे मनूर गावात शोककळा पसरला असून, त्यांना दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर मनूर बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: पुण्यातील बस चालकाची धुळे आगारात आत्महत्या

हेही वाचा: नांदेड : नुकसानग्रस्तांसाठी २४४ कोटींची मागणी

Web Title: Jalgaon Farmer Died After Being Hit By Bull

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonFarmer Death