Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील 40 किमी रस्त्याच्या कामांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Unmesh Patil

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील 40 किमी रस्त्याच्या कामांना मंजुरी

चाळीसगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन, जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे एका पत्रकान्वये आभार मानले आहेत. (Jalgaon Lok Sabha Constituency Approval for 40 km road works MP Unmesh Patil is thankful to Chief Minister Deputy Chief Minister Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

तालुक्यातील ज्या १७ रस्त्यांचा समावेश होता, त्या रस्त्यांची नावे अशी, तळोदा प्रगणे देहरे ते पिंपळवाड निकुंभ, ब्राम्हणशेवगे ते हिरापूर, पिंपरखेड ते शिवापूर रस्ता, पिंपळवाड निकुंभ ते माळशेवगे, पिलखोड ते तामसवाडी, वाकडी ते मुंदखेडा बुद्रुक व खुर्द, खेडे फाटा ते खेरडे सोनगाव, राष्ट्रीय महामार्ग २११ ते बोढरे, हिंगोणे खुर्द ते तांदुळवाडी, न्हावे वडाळा ते ढोमणे, लोंढे ते विसापूर, रोकडे फाटा ते रोकडे तांडा, खडकी बुद्रुक ते तांबोळे खुर्द, राष्ट्रीय महामार्ग २११ ते जुनोने, राष्ट्रीय महामार्ग २११ ते वडगाव लांबे, हातले ते हातले तांडा, राष्ट्रीय महामार्ग २११ ते नवे दसेगाव अशी ४०किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Jalgaon News : बाजार समितीतर्फे अवैध दुकाने बांधण्यास परवानगी