esakal | खानदेशातील हायमास्ट लॅम्प, सोलर पथदीपांचे ऑडिट
sakal

बोलून बातमी शोधा

highmast lamp

खानदेशातील हायमास्ट लॅम्प, सोलर पथदीपांचे ऑडिट

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : खानदेशातील सर्व जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षांत विविध योजनांमधून लावलेले हायमास्ट लॅम्प, सोलर पथदीपांचे ऑडिट करून प्रत्यक्ष जागेवर काय स्थिती आहे, याचा अहवाल देण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Nashik Divisional-Commissioner-Radhakrishna-Game) यांनी दिले आहेत. त्यासोबत या कामांची तपासणी करण्याचेही आदेश आहेत. अनेक ठिकाणी लॅम्प, पथदीप कागदावरच आहेत, अशी कामे केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. येत्या १ जूनपासून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. (Divisional-Commissioner-Radhakrishna-Game-Audit-high-mast-lamps-solar-streetlights)

नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध जिल्हास्तरीय योजनांमधून लोकोपयोगी कामांना मान्यता देण्यात येते. हायमास्ट लॅम्प आणि पथदीप (solar streetlights highmast lamp audit) ) ही कामे अनेक योजनांमधून अनुज्ञेय केली आहेत. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत मागील दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत मंजूर केलेल्या हायमास्ट लॅम्प आणि सोलर पथदीपांच्या कामांची सविस्तर माहिती विहित नमुन्यात मागविली होती. त्यानुसार प्राप्त माहितीनुसार, नाशिक विभागात ‘हायमास्ट लॅम्प व सोलर पथदीप’ या कामांसाठी दोन वर्षांत सुमारे ११९ कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

हेही वाचा: गांधी टोपीची कमाल..दुर्गम भागातही वाढला लसीकरणाचा टक्‍का

तपासणी पथकाची स्थापना

या योजनेची उपयुक्तता आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यासाठी उपायुक्त (नियोजन) यांच्यासमवेत विभागीय महाव्यवस्थापक (मेडा), कार्यकारी अभियंता (सा.बां. विभाग, नाशिक) आणि सहाय्यक संचालक (लेखा) (ताळमेळ शाखा, विभागीय आयुक्‍त कार्यालय, नाशिक) यांचे तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या बाबींची होणार तपासणी

तपासणी पथक अंदाजपत्रकातील समाविष्ट बाबी, अंदाजपत्रकासाठी वापरलेले दरपत्रक आणि तांत्रिक मान्यता, कामांची प्रशासकीय मान्यता, अटी व शर्ती, निधी वितरणाचा तपशील, निविदा, निविदेतील अटी व शर्ती आणि काम करणाऱ्या ठेकेदाराची निवड, कामाचा कार्यारंभ आदेश आणि त्यातील अटी व शर्ती, काम पूर्णत्वाचा कालावधी, कामे पूर्णत्वाचा तपशील या कामांची आवश्यकता होती का, याची पडताळणी समिती करणार आहे, तसेच देखभाल, दुरुस्तीबाबतची प्रक्रिया व प्रत्यक्ष कामांची पाहणीही समिती करणार आहे. तपासणी पथकातील सदस्यांनी १ ते ४ जूनदरम्यान नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून आपला पडताळणी अहवाल सादर करावा. जळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत तपासणी पथक केव्हा तपासणी करेल, याचे वेळापत्रक लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना (Jalgaon collector abhijit raut) पाठविण्यात येणार आहे.