फुकट टमाटे खाऊन..पिता-पुत्राची लूटमार

Eating free tomatoes..the robbery of father and son
Eating free tomatoes..the robbery of father and son

जळगाव, शहरातील कानळदारोड लक्ष्मीनगरातील रहिवासी तसेच भाजीपाला विक्रेते बाप-लेकाला फुकटात भाजीपाला मागुन न दिल्यास दोघांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत माल खरेदीचे ५ हजार रुपये बळजबरी काढून घेत देाघांना रक्तबंबाळ करुन पिटाळून लावण्यात आले. या प्रकरणी शहर पेालिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोघा संशयीतांचा पेालिस शोध घेत आहे. 

शहरातील कानळदारोड लक्ष्मीनगरातील रहिवासी यशवंत रामसिंग राजपुत(वय-५०) व त्यांचा मुलगा हेमंत असे दोघेही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे कृऊबातून देाघांनी भाजीपाला खरेदी करुन तो, हातगाडीवर ठेवुन गेंदालालमील परिसरात विक्री करीत होते. यावेळी देान तरुण त्याच्या गाडीवर येवुन टमाटे उचलून खाऊ लागले, त्यांना विरोध केल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन भाजीपाला फुकटता देण्याची मागणी केली. विरोध केल्यावर देाघा पिता-पुत्राला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. यशवंत राजपुत यांच्या खिश्यातून देाघांनी पाच हजार रुपये काढून पेाबारा केला. या प्रकरणी यशवंत राजपुत यांच्या तक्रारीवरुन रईस समशेर पठाण व मुशीब मुलतानी अशा देाघांच्या विरुद्ध जबरीलूटचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पेालिस देाघा संशयीतांचा शोध घेत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com