दारूसाठी हातावर मारली पट्टी; पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon police

दारूसाठी हातावर मारली पट्टी; पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे द्या नाहीतर मी हाताची नस कापून घेतो, असे म्हणत रात्री साडेनऊच्या सुमारास एकाने पोलिस ठाण्यातच (Jalgaon police station) गोंधळ घातला. त्याला तातडीने उपचारास रवाना करून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली. पोलिस ठाण्यात आत्महत्येचा (Suicide case) प्रयत्न केल्याप्रकरणी सागर महारू सपकाळे (वय ३१, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. (jalgaon-police-station-boy-attempt-suicide-in-police-no-money)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सपकाळे हा तरुण नेहमी दारू पिण्यासाठी पोलिसांना पैसे मागतो व त्यास नकार दिल्यास स्वतःला जखमी करून घेतो. यापूर्वीही त्याने अनेकदा असा प्रकार केला आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सागर सपकाळे शनिपेठ पोलिस ठाण्यात आला. पोलिस कर्मचाऱ्यांना उद्देशून ‘मला पैसे द्या नाहीतर मी माझ्या हातापायाला पट्टी मारून घेईन व तुमचे नाव कोर्टात व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेन,’ अशी धमकी दिली.

कर्मचाऱ्यांनी समजाविले पण

त्याला काही कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतः हाताने धारदार लोखंडी पट्टी मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हातातून निघालेले रक्त पोलिस ठाण्यातील फरशीवर शिंपडले व मला नियमित पैसे देत जा नाहीतर मी माझ्या मानेवर पट्टी मारून पोलिस ठाण्यामध्ये जीव देईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी सरकारतर्फे शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक योगेश माळी यांच्या फिर्यादीवरून सागर सपकाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Jalgaon Marathi News Jalgaon Police Station Boy Attempt Suicide In Police No

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..