लॉकडाऊच्या पुर्वसंध्येला पिंप्राळा हुडकोत देान गट भिडले; दगडफेकीत २ पोलिसांसह ६ जखमी 

लॉकडाऊच्या पुर्वसंध्येला पिंप्राळा हुडकोत देान गट भिडले
लॉकडाऊच्या पुर्वसंध्येला पिंप्राळा हुडकोत देान गट भिडले

जळगाव,-ः शहरातील पिंप्राळा हुडको वसाहतीच्या सिद्धार्थ नगरात काल ( सोमवारी 6 जुलै ) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास देान गटात दंगल उसळली.
 घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंद नगर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. दगडफेकीत दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात देान्ही  गटातील २९ संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील १६ संशयितांना पेालीसांनी  अटक केली असून त्याची पोलीस केाठडीत रवानगी करण्यात आली आहे. शहरात लॉकडाऊन लागण्या आधीच पिंप्राळा हुडकोत दंगल उसळली, दंगलीतील संशयीता विरुद्ध दंगल, प्राणघातक हल्ल्यासहआपत्कालीन परीस्थीतीत लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लघन प्रकरणी कलमांचा समावेश करण्यात आला आहे. 

पिंप्राळा हुडकोतील सिंध्दार्थ नगरात सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गटात वादविवाद होत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, रूपेश ठाकरे, वाहन चालक संतोष प्रल्हाद पाटील व दोन होमगार्ड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत दोन्ही गटाचा जमाव रस्त्यावर उतरला होता. दोन्ही बाजुने तुफान दगडफेक होऊन पोलीस कर्मचारी गोपाल चौधरी आणि रूपेश ठाकरे यांना दगड लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. काही केल्या हल्लेखोर नियंत्रणात येत नसल्याने अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घटनास्थळावर मिळून आलेल्या आठ संशयितांना ताब्यात घेतले असून दगडफेकीत शुभम संजय पवार, किरण किशोर खैरनार, रंजना किशोर खैरनार, विजय नाना कदम हे चौघे जखमी असून त्यांना उपचारार्थ जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. गल्लीत एकच धावपळ आणि दगडफेकीत अनील मोरे यांच्या घराबाहेर उभी सॅन्ट्रो कार क्र (एमएच.०२ अेयु.९५५६)चे नुकसान झाले आहे. 

यांच्या गुन्हा दाखल
भागवत रामचंद्र सुरवाडे, शंकर वसंत निकम, बापु प्रकाश सोनवणे, दीपक जगन भालेराव, वसंत नथ्थु निकम, राजु वसंत निकम, राहुल नामदेव इंगळे, हितेश नाना बाविस्कर, लताबाई नाना बाविस्कर, सविता दीपक भालेराव, सीमा भागवत सुरवाडे, ज्योती पिंटू भालेराव, छाया वसंत निकम, कल्पना अशोक सपकाळे, गीता दत्तू बिऱ्हाडे, रेखा गोपाळ कचोरे, वर्षा संजय पवार, पुजा किरण सपकाळे, किरण अशोक सपकाळे, चेतन बाविस्कर, फकिरा अडकमोल, राहुल गजरे, अजय अशोक सपकाळे, मिना नाना कदम, शुभम संजय पवार, किरण किशोर खैरनार, रंजना किशोर खैरनार, विजय नाना कदम आणि आनंद प्रकाश सोनवणे सर्व रा. पिंप्राळा यांच्यावर दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीतून तर भागवत रामचंद्र सुरवाडे, दीपक जगन भालेराव, बापू प्रकाश सोनवणे, राजू वसंत निकम, वसंत नथ्थू निकम, शंकर वसंत निकम, राहूल नामदेव इंगळे, हितेश नाना बाविस्कर यांच्यासह इतर आठ जणांना अटक केली आहे. अटकेतील संशयीतांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वार न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com