डोक्यावर हेल्मेट असते तर.. वाचला असता जीव ; एकाचा मृत्यू दुसरा अत्यवस्थ

अपघाती दुचाकीस्वारांना डोक्यावरच गंभीर दुखापती झाल्या असून ऐकमेकांचे डोक आदळले गेले आहे. दोघांनी हेल्मेट घातले असते तर कदाचीत दोघांचे जीव वाचले असते, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. 
अपघाती दुचाकीस्वारांना डोक्यावरच गंभीर दुखापती झाल्या असून ऐकमेकांचे डोक आदळले गेले आहे. दोघांनी हेल्मेट घातले असते तर कदाचीत दोघांचे जीव वाचले असते, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. 

जळगाव ः- जळगाव-औरगांबाद राज्य महामार्गावर विमानतळा समेारच देान दुचाकींचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना दुपारी एक वाजता घडली. अपघातात सुप्रीम कॉलनी येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ओढवला असून समोरील दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे.प्रीतेश सुरेश रायपुरे(वय-२८,रा.सुप्रीम कॉलनी असे मयत तरुणाचे नाव आहे.अपघाती दुचाकीस्वारांना डोक्यावरच गंभीर दुखापती झाल्या असून ऐकमेकांचे डोक आदळले गेले आहे. दोघांनी हेल्मेट घातले असते तर कदाचीत दोघांचे जीव वाचले असते, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. 

सुप्रीम कॉलनीतील प्रीतेश सुरेश रायपुरे (वय-२८) हा तरुण शिवाजीनगर येथील वर्कशॉपवर कामाला आहे. लॉकडाऊन असल्याने तो, आज घरीच होता. दुपारी बारा वाजता तो, एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. पोलीस ठाण्यातून निघाल्यानंतर तो, उमाळ्याला जात असताना विमानतळाच्या आऊटगेट नंतर समोरून हिरो सुपर स्प्लेंडर या विनानंबरच्या दुचाकीस्वाराने त्याच्या पॅशन-प्रो(एमएच.१९.अे.वाय.८०२६) या वाहनाला समोरून धडक दिली. अपघाता प्रसंगी जोरदार आवाज होऊन दोन्ही वाहनावरील चालक विरुद्ध दिशेला फेकले गेले. त्यात  प्रीतेश रायपुरे याचा जागीच मृत्यू झाला असून समोरील दुचाकीवरील तरुण विकास चंपालाल बारेला (रा.चिंचोली) हा गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 

मास्क काढताच मित्राला भोवळ
विमानतळा जवळ देान दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दोन्ही तरुण महामार्गावर तडफडत पडले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहने थांबत हेाती आणि बघून निघून जात होते. इतक्यात ईश्‍वर लोहार हा त्याच्या मित्रासह येत असताना अपघातस्थळावर थांबला. रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या तोंडावरील मास्क काढून बघितल्यावर रक्ताचा प्रचंड दर्प आणि जखमीची अवस्था पाहताच त्याला सिसारी येऊन भोवळ आली. स्वतःला सावरत त्याच्या सोबतच्या तरुणाने तत्काळ एमआयडीसी पोलिसांना मदतीसाठी फेान लावला. 

ॲम्बुलन्स मिळेना..
घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटील, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद,निलेश पाटील, कुसूंबा पोलीस पाटील राधेशाम पाटील अशांनी ॲम्ब्लन्स उपलब्ध होत नसल्याने तातडीने रिक्षात टाकून रुग्णालयात हलविले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com