बाधरुमच्या हिटरने घेतला बळी ; भु-अभिलेख कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शिवकॉलनी स्टॉप जवळील रहिवासी अरविंद निळकंठ पाटील (वय-55) सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले. येथे पाणी तापवण्याच्या हिटरला स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा राजेंद्र याने त्यांना तत्काळ उचलून जिल्हा रुग्णालयात आणले, तेथे तपासणी अंती त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

जळगाव :- शहरातील शिवकॉलनीतील रहिवासी तथा भु.-अभिलेख विभागात कार्यरत कर्मचारी अरविंद निळकंठ पाटील(वय-55) यांचा हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला.आज सकाळी 7:30 वाजता ते राहत्या घरातील बाथरूम मध्ये अंघोळीला गेले असताना हिटरच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या जोडणीत गळती होऊन हिटरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने त्यांना शॉक लागला. बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. 

शिवकॉलनी स्टॉप जवळील रहिवासी अरविंद निळकंठ पाटील (वय-55) सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले. येथे पाणी तापवण्याच्या हिटरला स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा राजेंद्र याने त्यांना तत्काळ उचलून जिल्हा रुग्णालयात आणले, तेथे तपासणी अंती त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. डॉ.सीमा भोळे यांनी खबर दिल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार विश्‍वनाथ गायकवाड करीत आहे. अरविंद पाटील यांच्या पश्‍चात मुलगा राजेंद्र पत्नी कल्पना आणि एक विवाहित मुलगी जावई असा परिवार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ;The victim was hit by a bathroom heater