महामार्गावर नादुरुस्त ट्रकवर आदळली रिक्षा;चालक गंभीर प्रवाशाचा उपचारादरम्यान  मृत्यू

A rickshaw collided with a faulty truck on the highway; the driver died while undergoing treatment
A rickshaw collided with a faulty truck on the highway; the driver died while undergoing treatment


जळगाव -ः कामावरून रिक्षाने घरी जात असताना रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, रवींद्र मधुकर जोशी (वय-४०) रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी हे एमआयडीसी कंपनीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतण्यासाठी ते, रिक्षा क्रमांक (एम.एच.१९. व्ही.७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात असताना जळगाव-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल त्रिमूर्ती समोर रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक (एम.एच.४१. जी, ५२२९) वर रिक्षा आदळली. यात चालक दिनेश मोहन घोळके यांसह प्रवासी रवींद्र जोशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पेालिसांनी धाव घेतली. इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी जखमींना तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत वाहतुक सुरळीत केली.एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूसह अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी रस्त्यावरील ट्रक ताब्यात घेतला असून पळून गेलेल्या ट्रकचालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

उपाचार सुरू होताच मृत्यू
जिल्‍हा सामान्य रुग्णालय शहरा पासुन लांब असल्याने रात्री बेरात्री रुग्णांना खास करून अपघातात जखमींना वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यावर जखमींना उचलून माघारी अजिंठा चौक, तेथून शिरसोली रेाड मार्गे दहा किलोमीटरवर देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात नेण्यात आले. देाघा जखमींची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी उपचाराला सुरुवात केली हेाती इतक्यात रवींद्र जोशी यांची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू ओढवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com