esakal | महाराष्ट्र पेालिसांची हरियाणात नामुष्की पोलीसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार ;
sakal

बोलून बातमी शोधा

Accused absconding in Maharashtra police in Haryana;

फरिदाबाद मध्ये हॉटेल शाईन-ईन मध्ये दोन स्वतंत्र खेाल्या बुक करून पोलीस पार्टी व दोघे चोरटे असे थांबले होते. पोलीस एका खोलीत चोरटे दुसऱ्या खोलीत रात्रीच्या जेवणानंतर पोलीस पार्टी आडवी झाली. अलगद देाघा भामट्यांनी पहाटे उठून हॉटेल मधून पळ काढला. 

महाराष्ट्र पेालिसांची हरियाणात नामुष्की पोलीसांच्या हातावर तुरी देत आरोपी फरार ;

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव, ः  स्टेटबँकेचे एटीएम फोडणाऱ्या निसार शकुर सैफी(वय-३८) इरफान शकुर सैफी(वय-२९,रा.हरीयाणा) या दोघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत हरीयाणा येथील हॉटेल शाईन-ईन मधून पलायन केले. कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने निमका कारागृहात सेाडण्यासाठी जिल्‍हापेठ पेालिस हरीयाणा गेले होते तेथे कोव्हीड तपासणी शिवाय दोघांना जमा करण्यास नकार दिला होता.स्थानिक पेालिस ठाण्यात नेणे अपेक्षीत असताना पेालिसांनी हॉटेल मध्ये संशयितांना घेऊन थांबल्याची संधी साधत चोरट्यांनी पलायन केले. बदरपुर पेालिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोद करण्यात आली आहे. 

शिवकॉलनी स्टॉप समोरील स्टेट बँकेचे एटीएम १२ जुलै रेाजी फोडण्यात येऊन त्यातून १४ लाख ४१ हजार ५०० रुपये लंपास झाले होते. एटीएम फोडून हरीयाणा येथे परतत असताना त्यांपैकी निसार व इरफान या देाघा भावंडाना पोलिसांनी पकडून त्यांच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा ते फरीदाबादच्या निमका कारागृहात होते. जिल्‍हापेठ पोलिसांनी देाघांना हस्तांतर करून जळगावी आणले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. केलेल्या गुन्ह्याचे प्रात्याक्षीकही करवून दाखवले.केाठडीची मुदत संपल्यानंतर देाघांना परत सेाडण्यासाठी हवालदार शिवाजी पवार, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, व शेखर पाटील असे चौघे गेले हेाते.  मंगळवार(ता.११) रोजी पेालिसपार्टी दोघा भामट्यांना घेवून फरीदाबाद मध्ये धडकले. निमका जेल वर संशयीतांना घेऊन गेल्यानंतर जळगावच्या कोव्हीड तपासणीनंतर दोन दिवसांचा प्रवास झाल्याने कारागृह प्रशासनाने नव्याने दोघा संशयीतांच्या कोरोना तपासणीची मागणी केली. पेालिसांनी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी संध्याकाळ झाल्याने उद्या येण्यास सांगितले. परिणामी पोलीस पार्टीने मुक्कामाचा निर्णय घेतला.नियमानुसार संशयितांना जेलने नकार दिल्यावर स्थानिक पेालिस ठाण्यात ठेवणे अपेक्षीत होते. तसे न केल्याने  हरीयाणा पेालिसांच्या गुन्ह्यातील संशयित महाराष्ट्र पोलिसांमुळे पळाल्याने ती नामुष्की संपूर्ण पेालिसदलावर ओढवली आहे. 


पोलीस झोपले..चोर पळाले
फरिदाबाद मध्ये हॉटेल शाईन-ईन मध्ये दोन स्वतंत्र खेाल्या बुक करून पोलीस पार्टी व दोघे चोरटे असे थांबले होते. पोलीस एका खोलीत चोरटे दुसऱ्या खोलीत रात्रीच्या जेवणानंतर पोलीस पार्टी आडवी झाली. अलगद देाघा भामट्यांनी पहाटे उठून हॉटेल मधून पळ काढला. 

चौघांचे निलंबन फिक्स
हवालदार शिवाजी पवार, प्रशांत जाधव,हेमंत तायडे व शेखर पाटील अशा चौघा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे कधीच न सापडणारे अटटल गुन्हेगार पळून गेल्याने या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पेालिस अधीक्षकांनी घेतली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी अंती चौघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 

loading image
go to top