गावाला सुतक पडेल असे सांगून शेतकऱ्याची आत्महत्त्या ;आर्थिक नियोजन केालमंडले त्यात दारूचे व्यसन जडले

गाढोदा येथे ठिबकच्या नळीने शेतकऱ्याने घेतला गळफास
गाढोदा येथे ठिबकच्या नळीने शेतकऱ्याने घेतला गळफास

जळगाव,  ः- आर्थिक नियोजन केालमडल्याने दारूचे व्यसन आणि त्यातून कौटुंबिक वाद या त्रासाला कंटाळून प्रकाश मानसिंग पाटील (वय 31 रा. गाढोदा ता. जळगाव) यांनी आपल्या शेतात ठिबकच्या नळीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. रक्षाबंधन सणाच्या दिवशीच्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील गाढोदा येथे प्रकाश मानसिंग पाटील हे आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहेत. घरापासून 500 मीटरच्या अंतरावरच त्यांचे शेत आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय आणि काही दिवसांपासून आर्थिक नियोजन कोलमडलेले, त्यातून दारूचे व्यसन जडले म्हणून कुटुंबात वाद शिरला. सोमवारी प्रकाश पाटील यांचे घरात किरकोळ वाद झाले. या वादानंतर प्रकाश पाटील यांनी त्यांचे शेत गाठले. याठिकाणी त्यांनी शेतातील ठिबकच्या नळी निंबाच्या झाडाला बांधत गळफास घेतला. रस्त्यालगत शेत असल्याने ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलीस पाटील भगवान मधुकर पाटील यांना माहिती दिली. तालुका पोलिसांना प्रकाराची माहिती देत प्रकाश पाटील यांना तत्काळ खाजगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरुण राठोड करीत आहेत.

सांगून गेले..गावाला सुतक पडेल
कुटुंबीय परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार, पारंपारीक शेती व्यवसाय, शेती करतांना आर्थीक नियेाजनाचा ताण आणि जुळवाजूळव करतांना प्रकाश पाटील यांना दारूचे व्यसन जडले. दारुमुळे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. या वादातून ते कुटुंबीयांना मी नदीत उडी घेईन, विषप्राशन करेन तसेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याबाबत सांगत होते. सोमवारी वाद झाला अन् प्रकाश पाटील यांनी सांगितल्यानुसार शेतात गळफास घेत आत्महत्या केली. शेतात जात असताना भेटणाऱ्या ग्रामस्थांना प्रकाश पाटील हे गावाला सुतक पडेल, गावात दुखवटा होईल असे सांगत होते. मात्र कुणालाही कळाले नाही की प्रकाश पाटील हे आत्महत्या करतील व त्यानंतरच गावाला सुतक पडेल असे. प्रकाश पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सुनंदाबाई, मुले भरत आणि संदीप, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com