पोलिसाला पिटाळून ; पंपचालकाकडून चोरुन पेट्रोल विक्री

पोलिसाला पिटाळून ; पंपचालकाकडून चोरुन पेट्रोल विक्री
पोलिसाला पिटाळून ; पंपचालकाकडून चोरुन पेट्रोल विक्री

जळगाव - गस्ती बंदोबस्तावर असलेल्या वर्दीतील पोलिसांना बंदचा आदेश सांगणाऱ्या पेट्रोल पंप चालकाकडून चोरीने पेट्रेाल विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल नाकारून पोलीस गेल्यावर इतर वाहन धारकांना पेट्रेाल भरून देणाऱ्या गणेश कॉलनीतील पेट्रोल पंप चालका विरुद्ध जिल्‍हा पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संक्रमणाची साखळी तेाडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून ७ जुलैपासून पुढील सात दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग आणि संचारबंदीच लागू करण्यात आली असून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पेट्रोलपंप चालकांनाही मार्गदर्शक सूचनांसह अर्टीशर्तीवर केवळ अत्यावश्‍यक सेवेतील ग्राहकांना पासेस वर पेट्रेाल वितरणाचे निर्बंध घालण्यात आले आहे. असे असताना गणेश कॉलनी रेाडवरील पलोड पेट्रोलपंपावर वेगळाच प्रकार बघायला मिळाला. बंदोबस्त ठिकाणी ड्युटीवर निघालेल्या पेालिसाला साकळी साडेसात वाजता पेट्रोल न देता .कायदा व नियमांचा डोस पाजून पेट्रेाल नाकारण्यात आले. मात्र, तो गेल्यावर इतरांनाच सर्रास विनापास सर्रास पेट्रोल वाटप होत असल्याचे ख्वाजामियाँ दर्ग्या जवळ बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर तपासणी अंती कारवाई करण्यात आली. 

अशी झाली कारवाई 
आज सकाळी ८.३० च्या सुमारास पलोड पेट्रोलपंपावर दुचाकीचालक शेख अजगर शेख चांद (वय-४०रा. शाहूनगर) हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ आर २५८३) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. पेट्रोलपंपावरील कर्मचारी खलील शेख गनी पिंजारी (वय-४० रा. खंडेराव नगर) जळगाव याने पेट्रोल भरत असल्याचे जिल्हा पेठ पोलिसांच्या निदर्शनास आले.  याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पलोड पेट्रोल पंप मॅनेजर अशोक हनुमंत पाटील (वय-५१) रा. नंदनवन नगर जळगाव यांच्यासह पेट्रोल पंप कर्मचारी आणि दुचाकीधारक यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com