पिंपळाची पानगळ..अन्‌ शेजाऱ्यांमध्ये महाभारत

पिंपळाची पानगळ..अन्‌ शेजाऱ्यांमध्ये महाभारत
पिंपळाची पानगळ..अन्‌ शेजाऱ्यांमध्ये महाभारत

जळगाव,- शहरातील शिवाजीनगर दाळफळ भागात पिंपळाचा पाला पाचोळा अंगणात पडल्याने शेजाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. अंगणात पडणाऱ्या घाणीसह केरकचरा पुन्हा शेजाऱ्याच्या जागेत फेकल्याने देान्ही शेजाऱ्यांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन खोट्या गुन्ह्यात अडवण्याची धमकीच शेजारी महिलेने दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजीनगर दाळफड परिसरातील रहिवासी प्रमिलाबाई ईश्‍वरलाल तिवारी (वय-७२)यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, प्रमिलाबाई कुटुंबासह दाळफड परिसरात वास्तव्यास असून त्याच्या जागेत पिंपळ वृक्ष आहे, या पिंपळ वृक्षाची पानगळ सुरू असल्याने पालापाचोळा शेजारी मधुबाई रमेशचंद्र व्यास (वय-६७)यांच्या दाळफळच्या जागेत पडतो. रोज सकाळी व्यास कुटुंबीय पिंपळाच्या पाला पाचोळ्यासह कुत्र्याची विष्ठा व इतर घाण एकत्र करून तिवारी यांच्या जागेत फेकत असल्याने अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. २७ जुलै रेाजी सकाळी व्यास यांनी हा सर्वकचरा तिवारी यांच्या अंगणात आणून टाकल्याने कडाक्याचे भांडण होऊन मधुबाई व्यास आणि वर्षा रामचंद्र व्यास यांनी वाद घालून प्रमिलाबाईंचे पती व मुलगा यांना खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन तपास पोलीस नाईक संजय झाल्टे करीत आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com