पहाटे कंपनी बाहेर रिक्षातच..तीघांच्या संशयीत हालचाली

Theft in closed company; Watchmen's vigilance arrests thieves
Theft in closed company; Watchmen's vigilance arrests thieves

जळगाव, ः- चिंचोली शिवारातील लोखंडी गज तयार करणाऱ्या कंपनीतून कच्चा माल चोरून चोरट्यांना वॉचमनच्या सततेने रंगेहात पकडण्यात आले आहे. तिघा चोरट्यांसह आटोरिक्षा ताब्यात घेण्यात येवुन पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक मनोज लक्ष्मण पवार (वय-४१), भरत मधुकर सोनार (वय-२७) आणि प्रशांत पंडीतराव सावळे (वय-२५) दोन्ही रा. गजानन महाराज मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी असे संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, चिंचोली(ता.जळगाव) शिवारातील भवानी माता मंदीराजवळ फ्रिंन्स इंटरप्राईजेस लोखंडी गज (आसारी) बनविण्याची कंपनी आहे. सोमवार (ता.३) रेाजी रक्षाबंधन असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्याची संधीसाधत चोरट्यांनी चक्क ऑटोरिक्षा आणुन चोरीची योजना आखली. सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कंपनीत शिरुन असारी तयार करण्याचा कच्चामाल चोरुन तो रिक्षात भरुन नेण्याच्या प्रयत्नात असतांना कंपनीतील वॉचमन जगन सेानवणे(रा.गलंगी,ता.चोपडा) कंपनीला लागून रस्त्यावर (एमएच १९ व्ही ६६४९)ही ऑटो रिक्षा दिसली. भल्या पहाटे ऑटोरिक्षा कशी आली..म्हणुन सोनवणे यांनी डोकावुन पाहिले असता त्यात चोरट्यांच्या संशयास्पद हालचाली दिसुन आल्या. तसेच कंपनीतील कच्चा माल चोरीला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मालक धनराज पाटील यांना फेान करुन बोलावुन घेतले. दोघा तिघांनी रिक्षाचालकासह तिघांना रंगेहात पकडले. तोपर्यंत एमआयडीसी पेालिस ठाण्यातून सहाय्यक फौजदार दिनकर खैरनार, संतोष सोनवणे, शांताराम पाटील, सिद्धेश्वर डापकर अशांनी धाव घेत कंपनी गाठली. तिघा भामट्यांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केल्यावर रिक्षाचालक मनोज लक्ष्मण पवार (वय-४१), भरत मधुकर सोनार (वय-२७) आणि प्रशांत पंडीतराव सावळे (वय-२५) दोन्ही रा. गजानन महाराज मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी असे, नाव त्यांनी सांगीतले. तिघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने पेालिस केाठडी सुनावली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com