Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समिती सभापतिपदी कुणाची बाजी? | Jalgaon Market Committee Chairman post result declared today jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Market Committee election

Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समिती सभापतिपदी कुणाची बाजी?

Jalgaon News : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठी महाविकास आघाडीतर्फे सुनील महाजन, श्‍यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील यांच्यात चुरस आहे, तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटानेही आपली तयारी केली आहे.

त्यामुळे शनिवारी (ता. २०) होणाऱ्या सभापतिपदी कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.

जळगाव बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीच्या पॅनलने ११ जागा जिंकल्या आहेत, तर भाजप व शिवसेना (शिंदे गट) प्रणीत पॅनलने आठ जागा जिकंल्या आहेत. ( Jalgaon Market Committee Chairman post result declared today jalgaon news)

महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या पॅनलचा सभापती होणार, हे निश्‍चित आहे. मात्र, या पॅनलमध्ये सभापतिपदासाठी जोरदार चुरस आहे. सुनील महाजन, श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांनी पहिल्या वर्षी आपल्यालाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी दावा केला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. तो अद्यापही सुटलेला नाही. अर्ज भरण्यावेळेस सभापतिपदाचा उमेदवार निश्‍चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाविकास आघाडी फुटल्यास भाजप-शिवसेना तयार

महाविकास आघाडीतील चुरस पाहता भाजप-शिवसेना शिंदे गटही तयारीत आहे. पद न मिळालेल्या नाराजांना गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांना बहुमतासाठी चार सदस्य आवश्‍यक असल्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

या गटाची राज्यात सत्ता आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन या गटाचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे हे नेते काय करिश्‍मा करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज निवड

बाजार समितीच्या एमआयडीसीतील संचालक मंडळाच्या सभागृहात शनिवारी (ता. १२) दुपारी बाराला बैठक होणार आहे. तालुका उपनिबंधक (सहकार) के. डी. पाटील पीठासीन अध्यक्ष असतील. सभापती व उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यात येतील.

त्यानंतर माघार घेण्याची मुदत देण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मतदान घेण्यात येईल; अन्यथा बिनविरोध निवड जाहीर करण्यात येईल.