Jalgaon Milk Union Election : मतदार अल्प पण पळविले नेत्यांच्या तोंडचे पाणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election voter

Jalgaon Milk Union Election : मतदार अल्प पण पळविले नेत्यांच्या तोंडचे पाणी!

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी केवळ ४४१ मतदार आहेत. मात्र, त्यांनी आता राज्याच्या राजकारणात कसलेल्या नेत्यांच्याही तोंडचे पाणी पळविले आहे. ‘जागेवरच बोला, सहल नकोच!’, अशी भूमिका अनेक मतदारांनी घेतली आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांचे नेतेही बुचकळ्यात पडले आहेत. (Jalgaon Milk Union Election Most refuse to go on trip Candidates also in trouble Jalgaon news)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या १९ जागांसाठी निवडणूक होत आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत. आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ आणि मंत्री महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी’ पॅनलमध्ये जोरदार लढत आहे. दोन्ही गटांनी आता थेट मतदारांच्या भेटी घेण्यावर जोर दिला आहे. मतदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सहलीचे नियोजन पण...

मतदारसंख्या कमी असल्यामुळे त्यांना सहलीला घेऊन जाण्याचे नियोजन दोन्ही गटांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. पण, बहुतांश मतदार येण्यास तयार नसल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

हेही वाचा: Nashik News : चिखलओहोळ आरोग्य केंद्रात एकदिवसीय बाळाच्या मृत्यूने खळबळ!

कोणताही वाईटपणा नको

कोणत्याही गटाकडून सहलीला गेल्यास मत उघडे पडणार आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर संबंधित राजकीय नेत्यांशी वाईटपणा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणासोबत सहलीला न जाण्याचा निर्णय काही मतदारांनी घेतला आहे. त्यामुळे सहलीच्या नियोजनाबाबत आता पॅनलनेही सद्यःस्थितीत थांबण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जे मतदार तयार आहेत त्यांच्यासाठी सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. मात्र, मतदारांच्या या भूमिकेमुळे दोन्ही गटांच्या उमेदवारांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

हेही वाचा: Nashik News : बँकांमध्ये ज्येष्ठांचा सन्मान हरविला; कामकाजाबाबत ज्येष्ठ नागरिकांची नाराजी