Jalgaon News : मांडळ- मुडी परिसरात वाळू तस्करी जोमात; भरारी पथक दिसेनासे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sand Smuggling

Jalgaon News : मांडळ- मुडी परिसरात वाळू तस्करी जोमात; भरारी पथक दिसेनासे

वावडे : मांडळ- मुडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महसूल व पोलिस विभागाच्या आशीर्वादाने दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. वाळू तस्करीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू आहे.

हेही वाचा: Jalgaon News : जिल्ह्यातील खाणपट्ट्यांची होणार मोजणी; तपासणीसाठी ETS पथक दाखल

गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. कोणालाही न जुमानता ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू माफियांकडून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग व पोलिस यंत्रणा मात्र गप्प आहेत. त्यामुळे वावडे, जवखेडे, लोण, भरवस मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले आहेत. अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही.

हेही वाचा: Jalgaon News : जिल्हाधिकारी साहेबांनी वाटेत वाळू वाहतूक पाहिली अन् केली धडक कारवाई

गाव - खेड्यांमधून भरधाव धावणाऱ्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली तर आम्ही हप्ते देतो. त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी मुजोरीची भाषा वापरतात. सुरू असलेल्या या वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा कोमात गेल्याचे तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी मांडळ मुडी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

भरारी गायब

तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याचे मानून वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकात व अधिकाऱ्यांच्या समावेश देखील करण्यात आला होता. वाळूसाठ्याचा लिलाव झालेला नसल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे.

अवैध वाळूच्या ओव्हरलोड ट्रॅक्टरमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. वाळूमाफियांना अनेकदा अधिकाऱ्यांवर ही हल्ले केलेले आहेत यामुळे जिल्ह्यात वाळूमाफियांची दहशत आहे. महसूल व पोलिसांनी पकडलेले ट्रॅक्टर महसूल व पोलिस ठाण्यातून पळून नेले जात असल्याने वाळूमाफियांवर कोणाचाच वचक नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा: Jalgaon News : जमीनच फाटलीय.. कुठं कुठं करणार पॅचवर्क?

टॅग्स :JalgaonSand Transport