Jalgaon News: समतानगरमध्ये तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Jalgaon News: समतानगरमध्ये तरुणाची आत्महत्या

जळगाव : शहरातील समतानगरातील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल हिरालाल सोनवणे, असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल सोनवणे आई, आजी व मोठा भाऊ गौतम यांच्यासोबत वास्तव्याला होता.

मजुरीचे करून उदरनिर्वाह करीत होता. रविवारी (ता. १९) दुपारी राहत्या घरात विशालने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्याचा भाऊ गौतम सोनवणे घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर विशाल याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

भावाचा मृतदेह पाहून गौतमसह नातेवाइकांनी आक्रोश केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई, भाऊ गौतम, आजी व बाबा असा परिवार आहे.

टॅग्स :Jalgaondeath