Latest Marathi News | जळगाव जिल्हा परिषद आरक्षणात दिग्गजांना झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Of Jalgaon

जळगाव जिल्हा परिषद आरक्षणात दिग्गजांना झटका

जळगाव : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांचे गट आरक्षीत झाल्याने त्यांना रिंगणाबाहेर राहावे लागणार आहेत. काही जणांच्या गट आरक्षीत झाले असले तरी महिला किंवा मुलीला संधी मिळणार आहे. (Latest Marathi News)

जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपच्या रंजना पाटील यांचा मतदार संघ सर्वसाधारण राखीव आहे, त्यामुळे त्या स्वत: किंवा त्यांचे पती प्रल्हाद पाटील हे वाघोड खिरवड गटातून रिंगणात उतरण्याची शक्यता. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भाजपचे लालचंद पाटील नशिराबाद- भादली गटातून सदस्य होते आता त्यांचा गट आता भादली- कुसूंबाखुर्द अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना संधी नसल्याने ते आता रिंगणातून बाहेर झाले आहेत. चाळीसगाव येथील भाजपचे पोपट भोळे यांचा वाघळी- पातोंडा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.

हेही वाचा: जळगाव महापालिका परिसर ‘भंगार मुक्त’; बॅनरचे ग्रहण अखेर सुटले

मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नंदू महाजन यांचा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने तेही आता रिंगणाबाहेर आहे. भिला गोटू सोनवणे यांचे बंधू भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांचा कानळदा भोकर गट आता सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. परंतु त्यांच्या पत्नी या मतदार संघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मधू काटे यांचा गटही राखीव झाल्याने ते सुद्धा रिंगणाच्या बाहेर आहेत.

प्रताप पाटील सुरक्षित

माजी पालकमंत्री व शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील मात्र सुरक्षित झाले आहेत. पाळधी- बांभोरी गटातून ते सदस्य होते. आता त्यांचा गट पाळधी असून तो आता सर्वसाधारण खुला आहे. शिवसेनेतून शिदे गटात गेलेले पवन भिला सोनवणे यांना कुसुंबा खुर्द हा गट अनुसूचित जाती राखीव झाल्यामुळे तेही आता सुरक्षित झाले आहेत, त्यांना लढण्याची संधी आहे.

हेही वाचा: "शिंदे बाळासाहेबांच्या विचाराने चालले आहेत अन् उद्धवजी पवारांच्या विचाराने"

आरक्षणनिहाय जागा अशा

सर्वसाधारण २०

सर्वसाधारण महिला : २१

अनुसूचित जाती : ०३

अनु. जाती महिला : ०४

अनु. जमाती : ०७

अनु. जमाती महिला : ०७

नागरिकांचा मागास प्रवर्ग : ०७

नामाप्र, महिला : ०८

हेही वाचा: कदमांची मुलुखमैदानी तोफ पुन्हा धडाडावी

हरकतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदत

आजच्या सोडतीनुसार निश्‍चित झालेल्या आरक्षण रचनेवर २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत हरकत व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे हरकती दाखल कराव्या लागतील.

असे गट असे आरक्षण

चोपडा तालुका (६ गट)

विरवाडे (सर्वसाधारण), अडावद (सर्वसाधारण), अकुलखेडा (सर्वसाधारण महिला), लासुर (सर्वसाधारण महिला), चहार्डी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), वर्डी (सर्वसाधारण महिला)

यावल (६ गट)

किनगाव बु. (सर्वसाधारण), दहिगाव (सर्वसाधारण महिला), न्हावी प्र.यावल (नामाप्र), बामणोद (सर्वसाधारण महिला), साकळी (सर्वसाधारण महिला), भालोद (सर्वसाधारण महिला)

रावेर (७ गट)

पाल (सर्वसाधारण), केऱ्हाळे बु. (सर्वसाधारण), वाघोड (सर्वसाधारण), निंभोरा बु. (सर्वसाधारण), चिनावल (नामाप्र महिला), वाघोदा बु. (सर्वसाधारण महिला), तांदलवाडी (अनु. जमाती)

मुक्ताईनगर (४ गट)

अंतुर्ली (सर्वसाधारण), उचंदे (अनु.जाती महिला), कुऱ्हा (नामाप्र), हरताळे (अनु. जमाती)

हेही वाचा: विलासराव अन् गोपीनाथरावांची राजकारणापलीकडील दोस्ती

बोदवड (२ गट)

नाडगाव (नामाप्र महिला), शेलवड (सर्वसाधारण)

भुसावळ (४ गट)

कंडारी (सर्वसाधारण महिला), निंभोरा बु. (सर्वसाधारण महिला), तळवेल (अनु. जाती), कुऱ्हे प्र.न. (अनु. जमाती)

जळगाव (५ गट)

कानळदा (सर्वसाधारण महिला), असोदा (सर्वसाधारण), कुसुंबे

खुर्द (अनु. जमाती), शिरसोली प्र.न. (सर्वसाधारण), म्हसावद (नामाप्र)

धरणगाव (४ गट)

नांदेड (सर्वसाधारण महिला), पाळधी खुर्द (सर्वसाधारण), पिंप्री खुर्द (सर्वसाधारण महिला), साळवा (अनु. जाती)

अमळनेर (५ गट)

कळमसरे ( सर्वसाधारण), पातोंडा (अनु .जाती महिला), दहिवद (अनु. जमाती), मांडळ (सर्वसाधारण), जानवे (सर्वसाधारण)

पारोळा (४ गट)

शिरसोदे (सर्वसाधारण), म्हसवे (सर्वसाधारण महिला), शिरसमणी (सर्वसाधारण महिला), तामसवाडी (सर्वसाधारण महिला)

हेही वाचा: अण्णा हजारे देखील विलासराव देशमुखांना विचारून उपोषणाला बसायचे

एरंडोल (४ गट)

विखरण (नामाप्र), रिंगणगाव (नामाप्र), कासोदा (नामाप्र महिला), तळई (सर्वसाधारण)

जामनेर (८ गट)

नेरी दिगर (नामाप्र), खडकी (अनु.जमाती महिला), सामरोद (अनु. जाती महिला), पाळधी (अनु. जाती), पहूर कसबे (नामाप्र महिला), पहूरपेठ (नामाप्र महिला), तोंडापूर (नामाप्र महिला), फत्तेपूर (अनु.जाती महिला)

पाचोरा (६ गट)

बांबरुड प्र.बो. (अनु.जमाती), लोहारा (सर्वसाधारण), पिंपळगाव बु. (सर्वसाधारण महिला), शिंदाड (अनु.जमाती महिला), लोहटार (अनु.जमाती महिला), नगरदेवळा (अनु.जमाती महिला)

भडगाव (३ गट)

गिरड (नामाप्र महिला), गुढे (अनु. जमाती), कजगाव (सर्वसाधारण महिला)

चाळीसगाव (९ गट)

बहाळ (अनु.जमाती महिला), वाघळी (अनु. जमाती महिला), टाकळी प्र.चा. (नामाप्र), उंबरखेड (अनु. जमाती महिला), मेहुणबारे (नामाप्र), सायगाव (सर्वसाधारण महिला), हिरापूर (अनु.जमाती महिला), रांजणगाव (सर्वसाधारण), घोडेगाव (सर्वसाधारण)

Web Title: Jalgaon Zilla Parishad Election Reservation Declared

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonzp election