Jalgaon News : पाचोरा येथे महिलेच्या पर्स मधून सव्वा लाखाचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold theft

Jalgaon News : पाचोरा येथे महिलेच्या पर्स मधून सव्वा लाखाचे दागिने लंपास

पाचोरा (जि. जळगाव) : अकोला येथे रेल्वेत नोकरीस असलेल्या व पाचोरा येथे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून एक लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे (Gold) दागिने लंपास झाले. (Jewels worth lakh stolen from a womans purse in Pachora Jalgaon News)

वाडीशेवाळे (ता. पाचोरा) येथील माहेरवाशीण मनीषा प्रशांत पाटील अकोला येथे रेल्वेत नोकरीस आहेत. चुलत भावाच्या लग्नानिमित्त त्या पती व दोन मुलांसह पाचोरा येथे आल्या होत्या.

रेल्वेस्थानकावरून रिक्षाने बसस्थानक व तेथून भडगाव रोड भागातील महाराणा चौकात आल्यावर त्यांना आपल्या पर्सची चेन उघडी दिसली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पर्स बघितली असता, त्यातील साडेतीन तोळे वजनाची, ७० हजारांची माळ, अडीच तोळ्यांची, ५० हजार रुपयांची चेन व पाच ग्रॅमचे, दहा हजारांचे कर्णफुले चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार विनोद शिंदे तपास करीत आहेत.