घराला पहाटेच्‍या सुमारास अचानक आग; दोन कुटुंब रस्त्यावर

घराला पहाटेच्‍या सुमारास अचानक आग; दोन कुटुंब रस्त्यावर
घराला पहाटेच्‍या सुमारास अचानक आग; दोन कुटुंब रस्त्यावर

पारोळा (जळगाव) : येथील गढरी गल्लीत दोन मजुरांच्या घराला पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे दोन कुटुंब रस्त्यावर (House fire in morning) आले. योग्य वेळी नगरपालिकेचे अग्नीशामक बंब (Fire bumb) पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आगीमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने दोन कुटुंब रस्त्यावर आले. (jalgaon-news-parola-two-house-fire-and-family-on-road)

घराला पहाटेच्‍या सुमारास अचानक आग; दोन कुटुंब रस्त्यावर
अन्नदानाच्या नावाखाली गव्हाचा गोरखधंदा; धान्य गोळा करणाऱ्या टोळ्या

गढरी गल्लीतील मजुर बापु रतन पाटील व बायजाबाई रतन पाटील यांच्या घराला आज पहाटे १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले; तर घराच्या छताला आग लागल्याने काही ठिकाणी छत देखील कोसळले. दोन वेगवेगळ्या घरातील साहित्याचा पंचनामा तलाठी निशिकांत पाटील यांनी केला. यात बापू रतन पाटील यांचे १ लाख २० हजारांचे तर बायजाबाई रतन पाटील यांचे १ लाख ६० हजार असे एकूण २ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

लागलीच बंब आल्‍याने अनर्थ टळला

पहाटे नगरपालिकेचे अग्नीशामक बंब लवकर दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. यावेळी कैलास पाटील, मनोज पाटील, नगरसेवक मनीष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. दरम्यान आगीमुळे मजुर कुटुंब रस्त्यावर आले असुन शासनाकडून तात्काळ मदत मिळावी; अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com