
Jalgaon News: कजगाव नूतन विकासोची निवडणूक अखेर बिनविरोध; 70 वर्षांची परंपरा राखली कायम
कजगाव (ता. भडगाव) : येथील नूतन विकास सोसायटीची निवडणूक तब्बल सत्तर वर्षांची परंपरा राखत बिनविरोध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कजगाव नूतन विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.
माघारीच्या शेवटच्या दिवशी आज (ता. २) दोन्हीकडील पॅनलप्रमुखांनी बसून, निवडणूक खर्च व गावातील सलोखा लक्षात घेता ही निवडणूक पारंपरिकरित्या बिनविरोध पद्धतीने पार पडली.
नवनिर्वाचित संचालक म्हणून स्वप्नील पाटील, रामदास महाजन, वासुदेव पाटील, शिवाजी बोरसे, निंबा महाजन, बालू पाटील, रवींद्र पाटील, हिलाल वाघ, प्रताप पाटील, भानुदास मोकळ, वैष्णवी पाटील, कासुबाई पाटील, जिजाबाई पवार यांची संचालक म्हणून निवड झाली आहे.
तर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील व संस्थेचे सेल्समन दादाभाऊ पाटील यांनी सहकार्य केले.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच