उमवि प्राधिकरणाच्या निवडणुकीची प्रक्रिया; लवकरच कार्यक्रम होणार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBCNMU

उमवि प्राधिकरणाच्या निवडणुकीची प्रक्रिया; लवकरच कार्यक्रम होणार जाहीर

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ चे कलम २६ अन्वये विविध प्राधिकरणाच्या विद्यमान सदस्यांची पाच वर्षांची मुदत ३१ ऑगस्ट २०२२ ला समाप्त होत आहे. या कायद्याच्या कलम ६२ (१) नुसार प्रत्येक नवनियुक्त प्राधिकरणाच्या सदस्यांची मुदत १ सप्टेंबर २०२२ पासून ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी असेल. या प्राधिकरणाच्या निवडणूक, नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्याचे कुलगुरूंनी निर्देश दिले आहेत. निवडणुकीबाबत संपूर्ण माहिती, अधिसूचना व इतर आनुषंगिक पत्रव्यवहार हा विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावरील www.nmu.ac.in/election या पोर्टलवर तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील कक्ष क्र.४०७ च्या बाजूला असलेल्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.

हेही वाचा: सोशल मीडियावर विद्यार्थिनीचे बनावट खाते

डॉ. भादलीकर प्रमुख

निवडणूक विभागप्रमुख म्हणून डॉ. एस. आर. भादलीकर हे काम पाहणार असून निवडणुकीसंदर्भातील मूळ कागदपत्रे व पत्रव्यवहार डॉ. एस. आर. भादलीकर, निवडणूक विभाग प्रमुख तथा उपकुलसचिव (विधी/माहितीचा अधिकार) कक्ष क्र.४१० तिसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, कबचौउमवि, जळगाव येथे स्वीकारला जाईल. तरी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्था व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, व्यवस्थापन प्रतिनिधी, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, यांनी नोंद घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव यांनी केले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील शाळा 'या' तारखेपासून सुरु होणार

Web Title: Kbcnmu Authority Election Process Started

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonelectionnmu
go to top