Jalgaon : बिबट्याच्या भीतीने नदीत उडी अन् लताबाईंनी वाचविला जीव | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latabai Koli while narrating the incident

Jalgaon : बिबट्याच्या भीतीने नदीत उडी अन् लताबाईंनी वाचविला जीव

कळमसरे (जि. जळगाव) : म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी (वय ५०) यांच्या बाबतीत संपूर्ण खानदेशकरांना आला आहे. (Latabai saved her life by Jumping in river in fear leopard Jalgaon Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : करवसुलीसाठी NMC दसऱ्यानंतर वाजवणार ढोल

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी या शुक्रवारी (ता. ९) तापी नदीकाठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. तसा चोपडा तालुका म्हटलं म्हणजे पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडेल ते भयावह दृश्य, पहाते तर काय चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला.

अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी तेथून नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापीपात्रात उडी घेतली. (नदीकाठी गाव असल्याने साहजिकच त्यांना थोडे पोहता येत होते.) डोळ्यासमोर एकच प्रश्न की बिबट्याच्या तावडीतून जीव कसा वाचेल; सुमारे साठ ते ६० किलोमीटर लताबाई कोळी या पाण्याचा प्रवाहात वाहत वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसऱ्या दिवशी नाविकाना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या.

लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारार्थ अमळनेरला हलवले व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पाचारण करून स्वाधीन केले.

हेही वाचा: ‘ऊर्ध्व गोदावरी’साठी 1 हजार 498 कोटींना मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Web Title: Latabai Saved Her Life By Jumping In River In Fear Leopard Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonLeopardRiver