Jalgaon News : ‘रेल नीर’चा स्टॉलधारकांना उशिरा पुरवठा; पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल | Late supply of Rail Neer to stall holders on railway station jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News : ‘रेल नीर’चा स्टॉलधारकांना उशिरा पुरवठा; पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल

Jalgaon News : ‘रेल नीर’चा स्टॉलधारकांना उशिरा पुरवठा; पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल

Jalgaon News : रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नाशिकपर्यंत रेल्वेस्थानकांवर रेल नीर पाणी बॉटल विक्री करणे अनिवार्य आहे. (Late supply of Rail Neer to stall holders on railway station jalgaon news)

परंतु प्रवाशांना विक्री करण्यासाठी संबंधित कंपनीकडून पाणी बॉटल वेळेवर मिळत नसल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी स्टॉलधारकांकडून करण्यात येत आहेत. तसेच मॅनेजर व सुपरवायझर स्टॉलधारकांना १२ तासानंतर पुरवठा करीत असल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले.

आधीच रेल नीर पाणी बॉटलमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी विक्री करण्यासाठी येत असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचे स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. रखरखत्या उन्हात प्रवाशांचा घसा कोरडा पडल्याने भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी थांबली की, प्रवासी सरळ स्टॉलकडे धाव घेत पाणी बॉटलची मागणी करतो.

मात्र रेल नीर पाणी बॉटलची सकाळच्या अकरापासून ऑर्डर दिल्यानंतर रात्री दहापर्यंत स्टॉलधारकांना एस. एन. फोरजी कंपनी पाणी बॉटल पुरवठा करीत नसल्याने स्टॉलधारकांमध्ये आक्रोश दिसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुसावळ रेल्वेस्थानकांवर २५ ते ३० स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉल धारकाला दिवसभरातून ३० बॉक्स पाणी बॉटल विक्री करण्यासाठी लागते. कंपनीला ऑर्डर दिली असता माल वेळेवर मिळत नसून पुरवठा केलेला माल कंपनीने मॅनेजर व सुपरवायझर किर्द कुमार (कानपूर) यांच्या माध्यमातून (एमएच ० जीआर ९८०९) या ट्रकद्वारे रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये पाठवला. या आधी स्टॉलधारकांना त्यांच्या स्टॉलवर पुरवठा होत असे.

मात्र कंपनीची मोनोपोली सुरू असल्याने स्टॉलधारकाला रेल नीर पाणी बॉटल हातगाडीवर माल भरून स्वतःच्या खर्चाने स्टॉलपर्यंत पोचविण्याची वेळ कंपनीने आणली असल्याच्या प्रतिक्रिया स्टॉलधारकांकडून व्यक्त होत आहेत. एका स्टॉलधारकांला दैनंदिन खर्च २७ हजार रुपये आहे. परंतु प्रवाशांना विक्री करण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नसेल तर रेल नीर ठेका रद्द करावा, त्या बदल्या जी कंपनी रेल्वेस्थानकावर पाणीपुरवठा करेल, अशा कंपनीला ठेका द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Jalgaonwaterrailway