तोंडापूर धरणाच्या भिंतीला गळती : गावकऱ्यांना धोका

तोंडापूर (ता. जामनेर) येथील खडकी नदीवर धरण आहे.
Dam
Damesakal

जळगाव : तोंडापूर (ता. जामनेर) येथील खडकी नदीवर धरण आहे. या धरणाच्या भिंतीला लागलेली गळती ही मोठी चिंतेची बाब आहे. या धरणामुळे गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.

जितेंद्र खिवसरा, प्रकाश सपकाळ, शेख इद्रिस शेख कादर, अशोक चौधरी, अनिल अग्रवाल, मनोज पाटील, आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

तोंडापूर धरणावरून अजिंठा लेणी सहित सतरा खेड्यांना पाणीपुरवठा होतो. तोंडापूर, कुंभारी, भारूडखेडा, मांडवे, खांडपे, ढालगाव, ढालसिंगी या गावांना धरणाचा लाभ होतो. हे धरण तोंडापूर गावाला लागून असल्याने गावकरी नेहमी चिंतेत असतात. धरणाच्या गळतीमुळे आम्हाला नेहमी भीती वाटते. पावसाळ्यात रात्र-रात्रभर गावकरी झोपत नाहीत. धरणाच्या पाण्याच्या ओव्हर फ्लोमुळे नदीवरील पुलावरून ८ ते १० फुटापर्यंत पाणी वाहते. त्यामुळे तीन ते चार दिवस वाहतूक बंद असते. गावाचा संपर्क तुटतो. गतवर्षी पुराच्या पाण्यामुळे दोन मुले, अनेक गो-धन वाहून गेले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. जिल्हा प्रशासनाने, पाटबंधारे विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Dam
पुणे : खडकवासला चौपाटीजवळ सुसज्ज वाहनतळाची गरज
Dam
चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com